शासकीय कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट सक्ती

Foto
वर्षभरात ७०१ अपघाती मृत्यू; अपघाती मृत्यू रोखण्यासाठी पोलिसांचे पाऊल
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या भीषण रस्ते अपघातांमध्ये एकूण ७०१ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, यामध्ये ६० टक्के मृत्यू हे दुचाकीचालकांचे असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या १७० मृत्यूंपैकी १०० मृत दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. अपघातातील हे मृत्यू रोखण्यासाठी आता पोलिस प्रशासनाने अॅक्शन प्लॅन तयार केला असून, प्रथम शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट
सक्ती लागू करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी बुधवारी (दि.१७) पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, उपायुक्त शर्मिष्ठा घारगे, सहायक पोलिस आयुक्त
सुभाष भुजंग यांची उपस्थिती होती. यावेळी पोलिस आयुक्त पवार म्हणाले की, अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये वयानुसार आकडेवारी काढली, तर १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. दुचाकी अपघातात डोक्याला मार लागलेल्या
जुनी दुचाकी घेताना खबरदारी घ्या
सेकंड हँड दुचाकी घेताना कागदपत्रे आवर्जून घ्या. कागदपत्रे नसल्याचे सांगत चोरटे इतर जिल्ह्यात नेऊन स्वस्तात दुचाकी विकतात. अनेकदा चोरटे थाप मारतात की, कागदपत्रे नंतर देतो. यासारखे प्रकार समोर आलेले आहेत. असे कुणासोबत झाले असल्यास त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी आणि स्वस्तात वाहनाच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
केसमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. नुकतेच एका पोलिस कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यूचे उदाहरण त्यांनी दिले.
वाहतूक संदर्भात मंगळवारी मनपा, आरटीओ आणि पोलिस यांची संयुक्त बैठक झाली. यात लेफ्ट टर्न, शहरात सुरू असलेले खोदकाम, अतिक्रमणे हटविणे याबाबत सविस्तर चर्चा झाली.
१७ ठिकाणी नवीन सिग्नल, यात देवळाई, हडको कॉर्नर, गोपाळ टी या ठिकाणांचा समावेश करण्यात आला. दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीने वाळूज, एमआयडीसी वाळूज येथे सीसीटीव्हीसाठी ३२ कोटींचा प्रस्ताव होता. यातील सहा कोटींचे सीसीटीव्ही मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. हेल्मेट वापरले तर गंभीर घटना
टाळणे शक्य आहे. त्यामुळे आयुक्तालयात कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे आवाहन केल्यानंतर आता विविध पोलिस ठाणे, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था अशा विविध ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. यानंतर नागरिकांना आवाहन करणार असल्याचेही त्यांन सांगितले.
https: Powered By: Vrudhee Solutions